अर्जुनी मोर. दी. 08 डिसेंबर : हल्ली प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. शिक्षणासोबतच अंगात असलेल्या सूप्त गुणांना वाव दिले पाहिजे. रोजगारासाठी अनेक क्षेत्र असतात. ते क्षेत्र ओळखून त्यात संधी शोधली पाहिजे. संगीत कला क्षेत्र हे मनोरंजनाचे साधन तर आहेच पण या क्षेत्रातही युवक युवतींना बराच वाव आहे.
या माध्यमातून गावातील युवकांना पुढे येण्याची संधी उपलब्ध होत असते. युवकांनी रोजगाराची संधी शोधली पाहिजे असे प्रतिपादन डाॅ. सुगत चंद्रिकापुरे यांनी केले. ते तालुक्यातील करांडली येथे मंडई निमित्त नवयुवक संस्कृती कला मंचच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रांगणात आयोजित समूह डान्स व एकल नृत्य स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मंचावरून बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक दाणेश साखरे होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे, योगेश नाकाडे, मुख्याध्यापक काटगाये, डॉक्टर गहाणे, मुख्याध्यापक संजय भांडारकर, प्राध्यापक साखरे, प्राध्यापक मानकर, शिक्षक भागवत बडोले, राजकुमार टेंभुर्णे, भुनेश्वर पेसने, ताराचंद नंदेश्वर, हिराचंद टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भांडारकर, दयानंद सहाकटे, सरिता नंदेश्वर, कंत्राटदार वसंत गहाणे, एच. के. राऊत, आशा इंदुरकर, रसिका ताराम, आदिती शहारे, कल्याण टेंभुर्णे, विजय गहाणे, विलास बोरकर उपस्थित होते. या स्पर्धेत 40 ते 45 चमुंनी भाग घेतला. कार्यक्रमासाठी नवयुवक सांस्कृतिक कलामंचचे अध्यक्ष अजय टेंभुर्णे, राष्ट्रपाल साखरे, निखिल जांभुळकर यांनी सहकार्य केले.