प्रतिनिधी / सालेकसा, दी. 08 डिसेंबर : तालुक्यातील कुणबीटोला (सोनपुरी) येथील गुपचूप विक्रेता. जागेश्वर विठोबा उईके वय 33 वर्ष यांचा दि. 02 डिसेंबर रोजी आमगाव सालेकसा रोडवर अपघात झाला होता. त्या अपघातात उईके यांचे निधन झालं होत.
मृतकाच्या परिवाराला आज 07 डिसेंबर रोजी आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी संत्वन भेट दिली. या भेटदरम्यान त्यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबीयांना पुढील कार्यास हातभार लावला.
या भेटी दरम्यान पंचायत समिती सदस्य जितेंद्र बल्हारे, ग्राम पंचायत सोनपुरी सरपंच अरुण मच्छीरके, काँग्रेस कमिटी जी.प. चे अध्यक्ष जागेश्वर नागपुरे, उपसरपंच उमेश चुटे, ग्राम पंचायत सदस्य जागेश्वर मच्छीरके, विजय लिल्हारे, अनुप चुटे, गौरी चुटे, भागचंद लिल्हारे, राकेश चुटे, धर्मराज चुटे, मुलचंद मच्छीरके इत्यादी उपस्थित होते.