गोंदिया, दी. 08 डिसेंबर : येथील खा. प्रफुल पटेल यांच्या पक्ष कार्यालयात सडक अर्जुनी तालुका, ग्राम डव्वा येथील ग्रामपंचायत सदस्य डीलेश्वरी नरेशकुमार कुरसुंगे, एकनाथ खुशाल गायधने यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व विकासात्मक कार्यावर विश्वास ठेवून माजी आमदार राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 07 डिसेंबर रोजी प्रवेश केला.
माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दुपट्टा वापरून पक्षात प्रवेश केला व पुढील वाटचालीचा शुभेच्छा दिल्यात. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, यशवंत गणवीर, रमेश चुर्हे, किशोर तरोने, रुपविलाश कूरसुंगे, योगेश्वरी चौधरी, सोहम चौधरी, रमेश बडोले, अनिल बिलिया, राकेश जैन, लीलाधर रहांगडाले, मधुकर गावराणे सहीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 74