अर्जुनी मोर. दी. 04 डिसेंबर : महाराष्ट्राची भूमी ही संत महात्मे व महापुरुषांची आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजेरी वर थाप मारून आपल्या कसदार भजनाच्या माध्यमातून मोठी क्रांती केली आहे. नवतरुणांना ऊर्जा देण्याचे माध्यम त्या काळात भजनांमध्ये दडले होते. संत गाडगे महाराजांनी हातात झाडू घेऊन गावांनगाव साफ करून रात्रीला कीर्तनाचे माध्यमातून समाज प्रबोधन केले.
पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रात अनेक साधुसंतांनी राष्ट्रपुरुषांनी व महापुरुषांनी बहुजनांच्या हितासाठी आपल्या विचारातून मोठी क्रांती केली आज या महापुरुषांच्या आचार विचारातून महाराष्ट्रात अतिशय मौल्यवान संस्कृती जपली जात आहे. आणि म्हणून माणसाला माणूस बनविण्याची ताकद संत महापुरुषांच्या विचारातच आहे. असे मौलिक विचार राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
ते तालुक्यातील इंजोरी येथे कार्तिक पौर्णिमा व मंडई कार्यक्रमाचे औचित्य साधून युवा मित्रपरिवार इंजोरी तर्फे आयोजित दी. 28 नोव्हेंबर रोजी भव्य खंजेरी भजन स्पर्धा व ह. भ. प. महाराजांचे सत्कार कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंजि. राजकुमार बडोले बोलत होते.
यावेळी बाजार समितीचे सभापती यशवंत परशुरामकर, गोंदिया जिल्हा परिषद चे गटनेते व जि. प. सदस्य लायकराम भेंडारकर, अनुसूचित जाती आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजहंस ढोक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लोकपाल गहाणे, बाजार समितीचे उपसभापती अनिल दहिवले, पंचायत समिती चे उपसभापती होमराज पुस्तोडे, नगरसेवक दानेश साखरे, पंचायत समिती सदस्य संदीप कापगते, कुंदाबाई लोगडे, पुष्पलता दृगकर, तथा रवींद्र खोटेले ,सरपंच सचिन डोंगरे, प्रतिभा बोरकर, निरुपाताई बोरकर ,विलास फुंडे, सुखदेव मेंढे ,विशाखा साखरे, प्रदीप कांबळे, लीनाताई प्रधान, मोरेश्वर सोनवाने, काशिनाथ कापसे, लैलेश शिवणकर, व्यंकट खोब्रागडे, भागवत लंजे, पुरुषोत्तम डोये, दीपकंर ऊके, मुख्याध्यापक रोकडे, सहाय्यक शिक्षक लाकेश्वर लंजे, डाकराम मेंढे व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून भजन पूजन व कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे हभप हरिभाऊ मेश्राम महाराज, हभप श्यामसुंदर मेश्राम महाराज, हभप मंगलमूर्ती शिवणकर महाराज, हभप एकनाथ मेश्राम महाराज, हभप मोरेश्वर मेश्राम महाराज, हभप लालाजी शिवणकर महाराज, हभप योगेश्वर महाराज, हभप ज्ञानेश्वरी शिवणकर, हभप संध्याताई मेश्राम, हभप देवराम पुस्तोडे, यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच इंजोरी येथील रजत एकनाथ ऊके यांची अग्नीवीर म्हणून निवड झाल्याने त्यांचे आई-वडील अर्चना ऊके यांचा साडी चोळी व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या खंजेरी भजन स्पर्धेत एकूण 15 संघ सहभागी झाले होते. यामध्ये पुरुष गटात प्रथम बक्षीस हिरापूर भजनी मंडळ, द्वितीय बक्षीस हस्तापूर भजनी मंडळ, तृतीय बक्षीस अंतरगाव भजनी मंडळ, चौथा बक्षीस विहीरगाव भजनी मंडळ, पाचवा बक्षीस माहुरकुडा भजनी मंडळ, तर सहावा बक्षीस ताडगाव भजनी मंडळ, तर महिला गटात प्रथम बक्षीस कोकणाई भजन मंडळ कवठा, द्वितीय बक्षीस चालना भजनी मंडळ ,तर तृतीय बक्षीस कवठा भजनी मंडळाला देण्यात आला. उत्कृष्ट गायक म्हणून पुरुषार्थ नेवारे तर उत्कृष्ट तबलावादक म्हणून मुकेश देशमुख व पुंडलिक तोंडफोडे यांना प्रोत्साहन पर रोख पुरस्कार देण्यात आले. प्रास्ताविक मोरेश्वर मेश्राम, संचालन सतीश शिवणकर तर उपस्थितांचे आभार लाकेश्वर लंजे यांनी मानले. या भजनी स्पर्धेला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
