गोंदिया ते तिरुपती विमानसेवा सुरु, राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी दाखविली हिरवी झेंडी.


गोंदिया, दी. ०२ डिसेंबर : जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून तब्बल वर्षभरानंतर आज ०१ डिसेंबर रोजी पासून प्रवासी वाहतूक सेवेला प्रारंभ झाला आहे. गोंदिया – हैदराबाद – तिरूपती पर्यंत या सेवेला प्रारंभ झाला असुन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हिरवी झेंडी दाखविल्या नंतर टेक ऑफ करत विमान रवाना झाला.



यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह इंडिगो विमान कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी गोंदियातुन विमानसेवा सुरू झाल्याने संपूर्ण देशभरात कनेक्टिव्हिटी होईल असे म्हणाले.

आम्ही आपसात बोलून लोकसभेची जागा ठरवू : खा. प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल हे ०१ डिसेंबर रोजी गोंदियात आले असता त्यांना आगामी 2024 मध्ये होऊ घातलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीत प्रफुल पटेल यांचा लोकसभेचा प्रवास पुन्हा सुरू होईल का असे प्रश्न विचारले असता खासदार प्रफुल पटेल यांनी सध्याचे भाजपचे खासदार सुनील मेंढे यांच्यासोबत आम्ही आपसात बोलून ठरवू असे म्हणत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या दावेदारीवर अधिक बोलणे टाळले.

सध्याच्या आरक्षणाच्या परिस्थितीवर कोणीही चुकीचे विधान करू नये : खा. प्रफुल्ल पटेल

सध्या महाराष्ट्रमध्ये मराठा आरक्षणावरून नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप केले जात आहेत. जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलल्यामुळे छगन भुजबळ यांना धमकी देण्यात आली होती. या प्रकरणावर खासदार प्रफुल पटेल यांनी बोलताना सध्याच्या परिस्थितीवर कोणीही चुकीचे विधान करू नये असे म्हणत जरांगे पाटील आणि भुजबळ साहेब यांना चुकीचे विधान न करण्याची विनंती यावेळी पटेलांनी केली.


 

Leave a Comment

और पढ़ें