वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता जनमाहिती अधिकार्यांने दिली तारखी वर तारीख ?


 नांदेड, प्रतिनिधि, दी. २८ नोव्हेंबर : माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा भ्रष्टाचाराला आळा बसावा व सामान्य नागरिक यांच्याकडून शासन व प्रशासन यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी ह्या कायद्याची निर्मिती झाली अाहे. परंतू काही जनमाहिती अधिकारी हे या कायद्याचे पालन करताना दिसत नाहीत. नांदेड जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे वसूरकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र राजूरा ( बू ) या अरोग्य केंद्रातील माहिती मागण्यासाठी डॉ. दुर्योधन चव्हाण जनमाहिती अधिकारी तथा उपसंचालक, अरोग्य सेवा ( प्रा.अरोग्य केंद्र/दवाखाने ) मुंबई यांच्याकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत 06/08/2023 रोजी अर्ज सादर केले आहे.

अर्जाची दखल घेत जनमाहिती अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण मुंबई यांनी 31/08/2023 रोजी जनमाहिती अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे अर्ज वर्ग करण्यात आले. वर्ग करण्यात आलेल्या अर्जाची दखल घेत जनमाहिती अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी 09/10/2023 रोजी जनमाहिती अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक अरोग्य केंद्र राजूरा ( बू ) यांच्याकडे अर्ज वर्ग करण्यात आले. माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे वसूरकर यांना 8 दिवसात माहिती उपलब्ध करून द्यावे. व तसा अहवाल विभागाकडे सादर करावे अशे आदेश देण्यात आले.

त्यानंतर जनमाहिती अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र राजूरा ( बू ) यांनी 25/10/2023 ला पत्र पाठऊन माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे यांना उपस्थित राहून माहितीचे अवलोकन करावे व माहिती घ्यावे अशे कळविण्यात आले. त्या प्रमाणे शिंदे हजर राहून माहिती चे अवलोक केले व माहिती तयार केल्यानंतर फिस भरण्यासाठी कळविण्यात येईल अशे लेखी स्वरूपात पत्र शिंदे यांना देण्यात आले. पण जनमाहिती अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी यांनी तारखेवर तारीख देत आहे. त्यामुळे शिंदे यांनी जनमाहिती अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र राजूरा यांच्या विरोधात माहिती आयुक्त खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. अधिकारी माहिती देण्यास हेतु परस्पर टाळा टाळ करीत अशल्याचे समोर आले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें