पोलीस स्टेशन सालेकसा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन, रक्तदान करून केले २६/११ तील हुतात्म्यांना अभिवादन!


प्रतिनिधी / सालेकसा, दी. २८ नोव्हेंबर : संविधान दिवस व मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीर जवान व निष्पाप नागरिकांच्या स्मृतीत प्रित्यर्थ्यात पोलीस स्टेशन सालेकसा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या आदेशान्वये गोंदिया जिल्हा पोलीस दल व एफडीएफसी बँक गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस निमित्त तसेच 26/11 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी निष्पाप नागरिक व विदेशी नागरिक यांच्या स्मृतीपीत्यर्थ लोककल्याण कार्यास सहकार्य करण्याकरिता पोलीस स्टेशन सालेकसा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर रक्तदान शिबिरात ६ पोलीस अधिकारी व १०२ पोलीस अंमलदार तसेच सालेकसा परिसरातील ६२ नागरिक असे एकूण १७० लोकांनी सहकार्य करत रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिर करिता एचडीएफसी बँक गोंदिया येथील दीपक पाटील, सुमित करमरकर, कार्तिक चौधरी तसेच लोकमान्य रक्तपेढी गोंदिया येथील डॉ. योगानंद परकीवार, डॉ. जितेंद्र साखरे, नितीन रायकर, पल्लवी पटले साक्षी माथुरकर असे उपस्थित राहून सहकार्य केले. २६/११ रोजी होणाऱ्या रक्तदान शिबिर करिता पोलीस स्टेशन सालेकसा येथील अधिकारी व अंमलदार सामाजिक कार्यकर्ते राहुल हटवार व रोहित बनोठे यांनी सालेकसा परिसरातील लोकांमध्ये रक्तदान बाबत जनजागृती करत रक्तदान करिता लोकांना आवाहन केले.

तालुका काँग्रेस कमिटीचे सहभाग
काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राजू दोनोडे सह जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे, छाया नागपुरे, वंदना काळे, गीता लील्हारे यांनी उपस्थिती दर्शविली. पंचायत समिती गट नेते जितेंद्र बल्हारे यांच्यासह युवक काँग्रेस जिल्हा महासचिव ओमप्रकाश लील्हारे यांनी रक्तदान केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे पोलिस विभागाच्या वतीने आभार व्यक्त केले गेले. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, अतिरिक्त कारभार उपविभागीय अधिकारी आमगाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, पोलीस हवालदार सुमेध चंद्रिकापुरे, पोलीस शिपाई जितेंद्र पगरवार यांनी रक्तदान शिबिर यशस्वी होण्याकरिता मोलाची कामगिरी बजावली.


 

Leave a Comment

और पढ़ें