पोलिस पाटील संघटनेच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांना निरोप


देवरी, दी. २८ नोव्हेंबर : पोलिस पाटील संघ जिल्हा कार्यकारणीच्या वतीने गोंदिया जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून २६ नोव्हेंबर रोजी सत्कार करण्यात आले. प्रसंगी म. रा. गा. का. पोलिस पाटील संघाचे गोंदिया जिल्हा सचिव राजेश बन्सोड, देवरी उपशाखा अध्यक्ष प्रकाश कठाणे, प्रेमलाल टेंभरे, शिवलाल सराटे क्षीरसागर आदी पोलिस पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें