अवैधरित्या मातीचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर उपविभागीय अधिकाऱ्यांची कार्यवाही


  • अवैध गौण खनिज उत्खन करणाऱ्या माफियांचे धाबे दनानले. 
  • उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे यांचे सर्वत्र कौतुक 

सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दिनांक : 24 नोव्हेंबर 2023 : सडक अर्जुनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिजचे उत्खनन करून वाहतूक करण्याचा सपाटा काही माफिया या पूर्वी करीत होते. मात्र आता माफियांचे धाबे दणाणले आहेत. अवैध गौण खनिज वाहतकिवर नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून अर्जुनी मोर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे हे सातत्याने कारवाई करीत आहेत.

दिनांक : 22 नोव्हेंबर रोजी सौंदड ते राका मार्गावर काही लोक वीणा परवाना मातीचे जेसीबी द्वारे उत्खनन करून ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या आधारावर उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे हे आपल्या टीम सोबत घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान संदिप चांदेवार रा. सौंदड यांचे मालकीचे वाहन ट्रॅक्टर क्रमांक : विनानंबर तर ट्रॉली क्रमांक – विनानंबर असे असून वाहन चालक : कमलेश ब्राम्हणकर रा. सौंदड यांचे कडून वाहन जप्त करण्यात आला आहे. तसेच सुधाकर चांदेवार रा. सौंदड यांचे मालकीचे वाहन ट्रॅक्टर क्रमांक विनानंबर, ट्रॉली क्रमांक – विनानंबर असे असून वाहन चालक रोशन चांदेवार रा. सौंदड यांचे कडून वाहन जप्त करण्यात आला आहे. तर घटना स्थळावरून जेसीबी पळून नेण्यात माफियांना यश आले आहे.

दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालय जमा करण्यात आले असून प्रत्येकी 1 लाख 5 हजार रुपयाचा दंड होणार आहे. दोन्ही ट्रॅक्टर चे दंड 2 लाख 10 हजार रुपये होणार असे उप विभागीय अधिकारी वरून कुमार शहारे यांनी सांगितले आहे. उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे यांनी अवैध गोन खनिज उत्खनन करणाऱ्या कथित माफ यावर वारंवार कारवाई करून शासनाचा महसूल बुडण्यापासून वाचवीला आहे. त्यामुळे त्यांचा सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच अर्जुनी मोर उपविभागातील अवैध गोण खनिज करणाऱ्या माफियांचे धाबे दनानले आहेत.

तालुक्यामध्ये अवैध गोन खनिज उत्खनन करण्यासाठी कृषी परवाना असलेल्या ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसेच अनेक ट्रॅक्टराना नंबरच राहत नाही. विना नंबरच्या ट्रॅक्टरचा वापर करून माफिया अधिकारी आणि जनतेच्या डोळ्यात धूळ झोकण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे अशा वाहन धारकावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे जनतेची लक्ष लागले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें