अर्जुनी मोर. दी. २४ नोव्हेंबर : सुगीच्या दिवसांत महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. उगाच पायपीट करावी लागते हि गंभीर बाब लक्षात घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करून सदर विकास कामे खेचून आणण्याचे काम केले.
त्या अनुसंघान मौजा दिनकरनगर येथे ७८ लक्ष रुपये, झाशीनगर ग्रामपंचायत अंतर्गत मौजा इंदिरा आवास अ, इंदिरा आवास झेड, भसबोडण व चुटिया येथे प्रत्येकी ८.६५ लक्ष रुपयांची कामे मंजूर करुन त्यांचे भुमिपुजन दि. २३ नोव्हेंबर रोज गुरुवार ला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे,पं.स. सदस्य घनश्याम धामट, सरपंच सुचित्रा शिल, उपसरपंच सुबोध मुजुमदार, खोकन सरदार, झाशीनगर येथे सरपंच आशाताई गदवार, उपसरपंच रविंद्र नाईक, ग्रामपंचायत सदस्य संजीव गुरनुले, दिलीप कोरेटी, लता किरसान, लक्ष्मी मेश्राम, कल्पना मांदाडे, कंत्राटदार सागर येळे, शिवम अग्रवाल व गावकरी उपस्थित होते.