सालेकसा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश


गोंदिया, दी. 23 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे 22 नोव्हेंबर रोजी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व विकासात्मक कार्यावर विश्वास ठेवून सालेकसा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन, नरेश महेश्वरी, सुरेश हर्षे, डॉ. अजय उमाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सालेकसा तालुक्यातील माईकल मेश्राम, बाजीराव तरोने यांची घरवापसी व ब्रजभुषण बैस, सुरेश कुंभरे, झनक नागपुरे, मुकेश मेहरे,  यशवंत शेंडे, महेंद्र सिंग बैस यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांचा माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दुपट्टा वापरून पक्षात प्रवेश केला. दरम्यान खा प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार तालुक्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी मायकल मेश्राम यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष पदी तर बाजीराव तरोने यांची सालेकसा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, सुरेश हर्षे, यशवंत गणवीर, डॉ अजय उमाटे, केतन तुरकर, अखिलेश सेठ, निकेश गावड, रघुजी नागपुरे, संतोष नागपुरे, चंद्रपाल पटले, किरण पारधी, रवी पटले, लव माटे, आरजू मेश्राम, सुरेश चुटे, शैलेश वासनिक, कपिल बावनथडे, प्रमोद कोसरकर, रौनक ठाकूर, दर्पण वानखेडे, कुणाल बावनथडे, नरेंद्र बेळगे, वामन गेडाम सहीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें