सडक अर्जुनी, दि. 23 नोव्हेंबर 2023 : ग्रामीण भागात खरीपाची पिके निघाल्यावर एक विरंगुळा म्हणून मंडई चे आयोजन केले जाते व त्याच दिवशी रात्रीला मनोरंजनासाठी नाटकाचे आयोजन करण्यात येते. नाटकात जे चांगले आहे ते डोक्यात घ्या व वाईट सोडून द्या. कारण चांगले विचार माणवाचे जीवनमान उंचावण्यासाठी पुरक ठरतात.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे तंत्रज्ञानाचे युग आहे. आणि या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण द्या. त्यांना चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करण्यासाठी प्रवृत्त करा. असे प्रतिपादन इंजिनियर यशवंत गणवीर यांनी मंचावरून केले ते मौजा परसोडी/सडक येथे मंडई निमित्ताने “तुच माझा भाग्यविधाता” या तीन अंकी नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावरून बोलत होते.
यावेळी नाटकाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि. यशवंत गणविर यांच्या हस्ते झाले. तर यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्वर पटले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रसंगी सरपंच तुळशीदास शिवणकर, रीता लांजेवार नगरसेवक सडक अर्जुनी, देवानंद वंजारी, माधोराव तरोणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.