सडक अर्जुनी, दि. 23 नोव्हेंबर 2023 : आजचे युग हे वैज्ञानिक क्रांती चे युग आहे, आजच्या काळात मनोरंजनाची आधुनिक साधने आहेत. परंतु या आधुनिक साधनांना बाजुला ठेवून वैज्ञानिक क्रांती च्या युगात लोककला लोप पावल्या सारखी झाली परंतु आपल्या झाडीपट्टी रंगभूमीवर लोककला टिकून आहे.
झाडीपट्टीत राहणारा रसिक आजही लोककला टिकवून ठेवण्यासाठी धडपड करतो. दिवाळी संपली की मंडई निमित्ताने नाटक, तमाशा, दंडार, लावणी इत्यादी प्रकारचे लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात संक्रांत झाली की शंकर पटाचे आयोजन केले जाते.
या निमित्ताने मनोरंजन करण्यासाठी नाटक तमाशा दंडार लावणी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आणि हे फक्त झाडीपट्टीच्या रंगभूमीवर सादर केल्या जाते. आपला परीसर हा झाडीपट्टीच्या नावाने ओळखला जातो आणि झाडीपट्टी रंगभूमी लोप पावलेली लोककला टिकवून ठेवत आहे. असे प्रतिपादन इंजिनियर यशवंत गणवीर यांनी मंचावरून केले ते 19 नोव्हेंबर रोजी ग्राम खोडशिवणि येथे मंडई नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावरून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच गंगाधर परशुरामकर, पं. स. सदस्य डॉ. रुकीराम वाढई, उपसरपंच सत्यवान नेवारे, माजी जि.प. सदस्य रमेश चुर्हे, विधानसभा अध्यक्ष योगेश नाकाडे, ग्रामपंचायत सदस्य इंदुताई परशुरामकर, युवा नेते प्रमोद लांजेवार, तथा गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
