संगणक परिचालक संघटनेचे एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न.


सडक अर्जुनी, दी. 21 नोव्हेंबर : पंचायत समिती सडक अर्जुनी येथे आपल्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक कर्मचारी संटनेतर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन विविध मागण्यांना घेऊन 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. यात : यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणक परिचालक यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, संगणक परिचालक यांना सुधारित आकृती बंधनुसार कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळेपर्यंत 20,000 रू मानधन मिळणे, जॉब सीकुरीटी मिळने, महिला प्रशुती रजा मिळणे, सदर धरणे आंदोलनाला पंचायत समिती सभापती संगीता खोब्रागडे, उपसभापती शालींदर कापगते, प.स. सदस्य शिवाजी गहाने, मधुसूदन दोनोडे, चरणदास शहारे यांनी भेट देऊन समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. धरणे आंदोलन यशस्वितेसाठी संघटनेचे पदाधिकारी व सर्व संगणक परिचालक यानी सहकार्य केले.


 

Leave a Comment

और पढ़ें