- दिवाळी स्नेह मिलन निमित्ताने चंद्रिकापुरे मित्रपरिवार तर्फे कार्यक्रमाचे आयोजन.
- हा महायुतीचा कार्यक्रम आहे : डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे
सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दिनांक 20 नोव्हेंबर 2023 : झाडीपट्टीचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. झाडीपट्टीच्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांचं पहिल्यांदाच आगमन झाले. त्यांच्या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे तसेच चंद्रिकापुरे मित्रपरिवार तर्फे दिवाळी स्नेह मिलन निमित्ताने औचित साधत सडक अर्जुनी येथील पटाच्या पटांगणावर 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सुनील फुंडे, अध्यक्ष भंडारा डिस्ट्रिक्ट कॉ. ऑपरेटिव बँक, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजू कारेमोरे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, यशवंत गणवीर उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया, डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे, केतन तूरकर अध्यक्ष जिल्हा युवक राष्ट्रवादि काँग्रेस पक्ष, दानेश साखरे उपाध्यक्ष जिल्हा युवक राष्ट्रवादि काँग्रेस पक्ष, मंजूताई चंद्रिकापुरे, डि. यू. रहांगडाले, तसेच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गोंदिया जिल्ह्यातील लावणी रसिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. गौतमी पाटील आणि गोंधळ असं समीकरण नेहमीच पाहायला मिळतो. मात्र आजच्या या कार्यक्रमात असा कुठलाही गोंधळ पाहायला मिळाला नाही. या संदर्भात गौतमी पाटील हिला विचारणा केली असता कधीतरी गोंधळ होत असतो मात्र प्रत्येक वेळेस होत नाही. आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि गोंदियात आल्यावर खूप छान वाटले अशी प्रतिक्रिया गौतमी पाटील हिने माध्यमांशी बोलताना दिली.
हा महायुतीचा कार्यक्रम आहे : डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे
डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे हे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत. यावेळी ते कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असल्यामुळे पत्रकारांनी त्यांना यावर जाब विचारले की सदर कार्यक्रम हा राष्ट्रवादीचा आहे. की शिवसेना शिंदे गटाचा आहे. त्यावर डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे बोलताना म्हणाले की हा कार्यक्रम महायुतीचा आहे. समोर निवडणूक लढताना तिकीट नेमका कुणाला मिळणार आहे. त्यावर सुगत चंद्रिकापुरे म्हणाले की समोर काय हालचाली होतात त्यावर डीपेंड आहे. त्यानंतर याची सविस्तर माहिती आम्ही मीडियाला देऊ, हा कार्यक्रम दिवाळी स्नेह मिलन निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. आणि या कार्यक्रमाला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जनतेने चांगली उपस्थिती लावली त्यामुळे समस्त नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो.