युवकांच्या मागणीवर गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेणार आ. विनोद अग्रवाल


  • पोलीस शिपाई भरतीची तयारी करत असलेल्या युवकांच्या मागणीवर गृहमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांची भेट घेणार आ.विनोद अग्रवाल

प्रतिनिधी/गोंदिया, दी. 18 नोव्हेंबर : मागील २ वर्षापासून जिल्ह्यात तसेच व अनेक वर्षापासून बेरोजगार युवक हे पोलीस भर्ती ची तयारी करीत आहेत.परंतु भर्ती न निघाल्याने नैराश्याच्या सामना युवकांना करावा लागत आहे. वयो मर्यादेचे बंधन असल्याने युवकांचे परिश्रम व्यर्थ जाऊ नये म्हणून पोलीस शिपाई भरती व्हावी या साठी शेकडो युवकांनी गोंदिया चे आ.विनोद अग्रवाल यांनी भेट घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्याची विनंती केली. ज्यावर आ.विनोद अग्रवाल यांनी लवकरच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री याना पत्राद्वारे पोलीस भरती बाबत पत्र लिहून तसेच भेटून चर्चा करणार असल्याचे सांगितले.

या दरम्यान आ.विनोद अग्रवाल यांना निवेदन सादर करताना पोलीस भर्ती ची तयारी करीत असलेले युवक राजेश भोयर, संदीप शहारे, सत्यम उपवंशी, संगम शहारे, शिवम भगत, चंदू बसेना, विक्की लिल्हारे, राहुल बरेले, गुरुदेव दमाहे, व इतर युवकानी निवेदन सादर केले. रावणवाडी हे गोंदिया तालुक्याचे मध्यास्थान असून या ठिकाणी युवकांसाठी वाचनालय उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.


 

Leave a Comment

और पढ़ें