गोंदिया, दि. 15 नोव्हेंबर : पोलीस ठाणे गंगाझरी येथील पोलिसांना दिनांक 14 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे त्यांनी 3 : 30 वा. च्या सुमारास मौजा – मुंडीपार एमआयडीसी जवळील निम टेकडी, ता. जि. गोंदिया येथे धाड कारवाई करून तासपत्यावर पैशांची हारजीत लावून जुगार खेळ खेळणाऱ्या 08 इसमांपैकी 05 इसमांना ताब्यात घेतले.
जुगार खेळणाऱ्या इसमांच्या ताब्यातून रोख रक्कम 1,850/- रुपये, विविध कंपनीचे 03 मोबाईल हँडसेट व 03 मोटार सायकलस् असा एकुण 1, 71, 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पो. स्टे. गंगाझरी येथे 08 आरोपींविरोधात अप. क्र. 452/2023 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी : 1) अनुप रामप्रसाद मेंढे, वय 30 वर्ष, रा. मुंडीपार, 2) प्रवीण दिवाण बर्वे, वय 35 वर्ष, रा.सेजगाव खुर्द., 3) प्रतीक्षेप उर्फ विक्रम कुवरलाल गोंधरे वय 25 वर्ष, रा. सेजगाव खुर्द., 4) मुन्ना राजकुमार गोंधरे, वय 36 वर्ष,रा.सेजगाव खुर्द., 5) येवन रुदन वाढिवे, वय 43 वर्ष, रा. मुंडिपार,
तसेच घटनास्थळावरून पळून गेलेले आरोपी, 6 ) रवीकुमार तेजराम भगत, वय 45 वर्ष, रा. सेजगाव खुर्द, 7 ) पंकज कन्हैया कोहळे, वय 35 वर्ष, रा. मुंडिपार, 8) सनोज रामचंद्र बर्वे, वय 45 वर्ष, रा. सेजगांव खुर्द अशी तासपत्यावर जुगार खेळणाऱ्याची नावे आहेत. सदरची कामगिरी मा. वरिष्ठांच्या निर्देश सूचनाप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली पो. नि. महेश बनसोडे, पो. हवा. राकेश भुरे, पो. ना. महेंद्र कटरे, हरीश कटरे, पो.शि. श्रीकांत नागपुरे , प्रशांत गौतम यांनी केली.
