चुटीया येथे महामानव, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम संपन्न. 


गोंदिया, दि. 15 नोव्हेंबर : चुटिया येथे महामानव क्रांतीवीर बिरसा मुंडा समिती च्या वतीने आदिवासी समाजक्रांतीचे जनक, जननायक, भगवान बिरसा मुंडा यांच्या 148 व्या जयंती निमित्त ध्वजारोहण सोहळा माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या हस्ते पार पडला. माजी आमदार श्री जैन यांनी आदिवासी स्वातंत्र्यवीर, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले.

कमीत कमी वयामध्ये दमनकारी इंग्रजांच्या राजवटी विरुद्ध बंड करणारे पहिले आदिवासी तसेच आदिवासी समाजात सुधारणा करून समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी लढा देणारे समाज सुधारक, आदिवासी समाजाच्या उत्थानाकरिता महान कार्य करणारे महामानव, भगवान बिरसा मुंडा हे खऱ्या अर्थाने जननायक होते. असे प्रतिपादन माजी आमदार श्री जैन यांनी केले.

यावेळी सर्वश्री राजेन्द्र जैन, केतन तुरकर, करण टेकाम, दुर्योधन मेश्राम,रमेश टेंबरे, अंकुश मारगाये, राजकुमार टेकाम, श्यामजी मेरेसरे पिंटू नाईक पंकज राऊत राकेश नाईक गोरख पुरव भंडारी,रामू टेकाम, महेंद्र मारगाये, राजेश नाईक, संजय दीहारी, अरूण उईकें, देवानंद सराटे, महेन्द्र वटी, जमेंद्र वटी, आकाश उईके, भुमेश्वर दिहारी, मनोहर मारगाये, दिनेश नाईक, रणजित मडावी, राघनबाई वटी, खेलनबाई नाईक, चित्रकला नाईक, सेवकाबाई कोठेवार, छायाबाई वटी, गीताताई चुलपार, प्रमिला कोठेवार, पदमाबाई उईके, ननुबई वटी, नीलाबाई मारगाये, वसंती वारई, वच्छला सराटे, प्रमिला मरस्कोल्हे, कविता मारगाये, मयनबाई दिहारी, शिवचरण टेकाम, महेंद्र सराटे, सुमित राणा, महेश परसगाये, नरेश कोठेवार सहीत मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें