यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतील १५२ प्रस्तावांना आमदार चंद्रिकापुरे यांच्या विशेष प्रयत्नाने निधी मंजूर.


सडक अर्जुनी, दि. 10 नोव्हेंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात गोरेगाव, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोर, तालुक्याचा समावेश होतो. या तिनही तालुक्यामध्ये भटके-विमुक्त असून त्यात ढीवर समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाची दयनदीय अवस्था असून घरे मोडकडीस आलेले आहे. या समाजाला घरकुल मिळावे यासाठी आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांनी सुरवाती पासून प्रयत्न केले.

निवडून आल्यानंतर या समाजाला यशवंतराव चव्हाण वसाहत घरकुल योजनेतून ‘घरकुल’ मिळण्याकरीता तारांकीत प्रश्न विधानसभेत उपस्थीत केला. स्वत: पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या कडून सुरवातीला 801 घरकुलाचे प्रस्ताव मंजुर करून निधी करीता मंत्रालयात पाठविले. परंतु राष्ट्रवादीचे सरकार गेल्या नंतर निधी मिळाली नाही.

आता पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत गेल्यानंतर पुन्हा त्यांनी प्रयत्न केले. त्यात ५५२ घरकुले मंजुर करण्यात आले, या पूर्वी १० लाख रुपये, ३६६ च्या यादी मधुन १० लाख रुपये, ४३५ यादी मधून २ कोटी ४२ लाख मंजुर करुन घेण्यात विशेष सहकार्य केले. उर्वरीत संपुर्ण घरकुल मंजुर करण्यात येथील आणि लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येथील असे सांगीतले. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी उमराव मांढरे संघटक संघर्ष वाहिनी गोंदिया जिल्हा यांनी साहेबांना खुपदा निवेदन दिले होते.

सदर घरकुल प्रस्ताव मंजुर झाल्यामुळे ढिवर संघटनेचे व संघर्ष वाहिनी चे पदाधिकारी पदाधिकारी, उमराव मांढरे, यादोराव सोनवाने, ( अर्जुनी/मोर ) गोमाजी शेंन्डे (कोसमतोडी) धरमलाल मांढरे पुतळी, निलकंठ मेश्राम महेंद्र दिघोरे, यशवंत दिघोरे, नरेश केवट यांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे अभिनंदन केले. उरलेले प्रस्ताव यांना लवकर निधी उपलब्ध करून देण्यासाठी वीनती केली.


 

Leave a Comment

और पढ़ें