जांभळी येथे महामानव बिरसा मुंडा जयंती महोत्सव 17 रोजी.


सडक अर्जुनी, दि. 10 नोव्हेंबर : तालुक्यातील ग्राम जांभळी – दोडके येथे दि. 17 नोव्हेंबर रोज शुक्रवारला बिरसा मुंडा जयंती आणि समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी 09 वाजता आदिवासी गौरव रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली जांभळी, दोडके, लोधी टोला. या गावात निघेल आणि दुपारी 01 वाजता ध्वजारोहण व मान्यवरांचे स्वागत सोहळा, 02 वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन, समाज प्रबोधन आणि आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल.

कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सहसराम कोरोटे, दीप प्रज्वलन माजी मंत्री राजकुमार बडोले, कार्यक्रमाचे अध्यक्ष फरेंद्र कुतिरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, प्रमुख उपस्थित राष्ट्रीय संघटक बिरसा बिग्रेट सतीश दादा पेंदाम, भरत मडावी गोंड समाज संघटन गोंदिया, जिल्हाध्यक्ष चेतन उईके, मडावी नगराध्यक्ष, संदीप ताराम पोलीस उपनिरीक्षक, ची. के. सलामे सहआयुक्त मत्स्य विभाग गोंदिया, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत समाज प्रबोधन कार्यक्रम होणार आहे.

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त रात्रीला 9 : 30 वाजता माऊली नाट्य रंगभूमी वडसा प्रस्तुत तीन अंकी नाटक “बांगड्या फुटल्या प्रेतावर” या नाटकाचे आयोजन आदिवासी नवयुवक कला मंडळाच्या सौजन्य आयोजित करण्यात आले आहे.

नाटकाचे उद्घाटक आमदार मनोहर चंद्रिकापुरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष गंगाधर परशुरामकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.

समाज बांधवांनी उपस्थित राहण्याची विनंती आव्हान आदिवासी कृती समिती आणि आदिवासी नवयुवक कला मंडळाचे पदाधिकारी टीकाराम पंधरे, हवन लटये, भय्यालाल ईळपाते, मेघराज सिरसाम, नूतन मंडारे, भीवराम पंधरे, कैलास पुसाम, भीमराव मंडारे अन्य समाज बांधवांनी केले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें