गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दी. 05 नोव्हेंबर : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका येथील ग्राम पंचायत श्रीराम नगर येथे आज 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक संपन्न झाली. सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम अंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील एक मात्र ग्राम पंचायत निवडणुकीच्या रिगणात आहे. ग्रामपंचायत श्रीराम नगर हे पुनर्वशीत गाव असल्याने या गावातील नागरिकांच्या विविध मागण्या शासनाने मान्य न केल्यामुळे यापूर्वी झालेल्या निवडणुकीवर सदर ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकले होते.
मात्र गावातील विविध विकास कामे रखडल्यामुळे गावातील नागरिकांनी अखेर निवडणुकीचा मार्ग निवडला असून आज 05 नोव्हेंबर 2023 रोजी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली आहे.
वार्ड क्र : 1 मधे 75 महिलांनी मतदान केले तर 63 पुरुषांनी मतदान केले आहे. सदर वार्ड मध्ये एकूण 138 मतदारांनी मतदान केले. तर एकूण मतदान 158 आहे. या वार्डमध्ये 20 मतदारांनी मतदान केले नाही असे या आकडे वारीवरून लक्षात येते.
तर वार्ड क्रं : 2 मध्ये 109 महिलांनी मतदान केले असून 101 पुरुषांनी मतदान केले आहे. 210 मतदारांनी मतदान केले असून या वार्ड मध्ये एकूण 240 मतदान आहेत. तर 30 मतदारांनी मतदान केले नाही.
वार्ड क्रं : 3 मधे 70 महिला मतदारांनी मतदान केले तर 69 पुरुषांनी मतदान केले आहे. असे एकूण 139 मतदारांनी या वार्ड मध्ये मतदान केले आहे. एकूणच 164 मतदार या वार्ड मध्ये आहेत. 25 मतदारांनी या वार्ड मध्ये मतदान केले नाही.
गावात एकूण मतदान 562 इतकं आहे. 487 मतदारांनी मतदानाचे हक्क बजावला आहे. तर 75 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. एकूणच 86.65 टक्के मतदान झाले.
7 सदस्य आणि 1 सरपंच अशी एकूण 8 लोकांची बॉडी आहे. सात सदस्यांसाठी 14 उमेदवार, तर सरपंच पदाकरिता 2 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. या निवडणुकीत 11 महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर 5 पुरुष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ( ना. मा. प्र. स्त्री. ) प्रवर्गातील दोन महिलां सरपंच पदा करिता निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यात ग्रामविकास परिवर्तन पॅनलकडून रत्नमाला किशोर शेंडे
तर युवा जनसेवा पॅनलचे हेमलता राजेश गायधने या दोन महिला उमेदवारांमध्ये सरपंच पदासाठी लढत होत आहे. ही निवडणूक दोन पॅनलच्या माध्यमातून श्रीरामनगर येथे लढविली जात आहे. येत्या 7 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. त्या मुळे झालेल्या निवडणुकी मध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.