पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थीतीत; पक्ष कार्यकारिणी बैठकीचे आयोजन.


  • ६ नोव्हेंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गोंदिया व सडक अर्जुनी येथे पक्ष कार्यकारिणी बैठकीचे आयोजन

गोंदिया, दि. 04 नोव्हेंबर : विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले खा. प्रफुल पटेल, सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम,  रुपालीताई चाकणकर महिला प्रदेशाध्यक्षा, सुरज चौहान युवक प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर हे ०६ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्हयात पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दि. ६ निव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता एन एम डी महाविद्यालय सभागृह गोंदिया येथे पक्ष कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले आहे. तसेच दुपारी २ वाजता आशीर्वाद लॉन, शेंडा रोड, सडक अर्जुनी येथे पक्ष कार्यकारिणी बैठक चे आयोजन केले आहे.

या सर्व कार्यक्रमांना पक्षातील सर्व सेल व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ता, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक, सरपंच व ग्रामपंचायत चे सदस्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें