”पोलिस खबऱ्या” अशल्याच्या संशयावरून माजी सरपंचाची हत्या ! 


गोंदिया, दी. 03 नोव्हेंबर : गोंदिया जिल्ह्याला लागून अशलेल्या मध्यप्रदेश राज्यातील लांजी पोलीस ठाण्यांतर्गत येणारे ग्राम पंचायत कोसमरा येथील भक्कुटोला गावात माजी सरपंच शंकरलाल पंधरे यांची चार सशस्त्र अज्ञात  नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही हत्या पोलिसांचा खबऱ्या अशल्याच्या संशयावरून झाल्याचे सांगितले जात आहे.

02 नोव्हेंबर च्या रात्री 10 वाजताच्या सुमारास 4 जणांनी मृतकाच्या घराचा दरवाजा ठोकला आणि विचारणा केली. 4 लोकांमध्ये एक महिला आणि तीन पुरुष होते, अशी माहिती मृतकाची पत्नी कासनबाई पन्द्रे यांनी मीडिया कर्मी यांना दिली, चौघांकडे बंदुका होत्या, त्यांनी मृतकाचा मोबाईल मागितला, पण तो सापडला नाही. तेव्हा त्यांनी संपूर्ण घर शोधले आणि नंतर तासाभराने ते घरातून बाहेर आले.

घराच्या थोड्याच अंतरावर नेवुन गोळी झाडून शंकरलाल यांची हत्या केली. गावचे सरपंच दिलीप धानोळे यांनी सांगितले की, माजी सरपंचावर नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडल्याची माहिती आज 03 नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांना ग्रामस्थांकडून मिळाली, त्यावर त्यांनी लांजी पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना माहिती दिली, मात्र घटनेला तब्बल ९ तास उलटूनही पोलीस पथक सदर ठिकाणी पोहोचले नव्हते.

बालाघाट जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की निवडणुकीच्या पास्वभूमीवर पोलिस अलर्ट मोडवर आहेत. या घटणे मुळे नक्षलवादी यांनी आपली खरी ओळख दाखऊन दिली. या घटणे मुळे आम्ही अधिक अलर्ट मोडवर राहणार आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें