- ट्रक तहसीलदारांच्या स्वाधीन, होणार लाखोंचा दंड!
- तहसीदरांच्या संगणमताने अवैध वाहतूक सुरू आहे : माजी आमदार संजय पुराम
गोंदिया, ( बबलू मारवाडे ), दि. 02 नोव्हेंबर : देवरी तालुका अंतर्गत येणारे ग्राम पुराडा नजिक ए. जी. पी. एल. कंपनी मार्फत गौण खनिजाचे उत्खनन गेली अनेक दिवसा पासून सुरु आहे. विशेष म्हणजे क्षमते पेक्षा उत्खनन आणि वाहतूक ओवर लोड भरून ट्रक गाव मार्गाने वाहतूक करीत असल्याने पुराडा ते सिरपूर असा 10 कोलो मीटर लांबीच्या रस्त्याची संपूर्ण दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.
अवैध रित्या उत्खनन करून दगड वाहून नेणाऱ्या दोन ट्रक ला गावकऱ्यांनी आज 02 नोव्हेंबर रोजी रस्त्यात अडवले. त्याची रॉयल्टी चेक केली असता. एकाच रॉयल्टी वर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत अवेध वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास येताच. गवाकऱ्यांनी माजी आमदार यांना सोबत घेत तहसीलदार यांना गावात बोलावून घेत रॉयल्टी चेक केली आहे.
ए. जी. पी. एल कंपनी अवैध रित्या गौण खनिजाची वाहतूक करीत असल्याचे लक्षात येताच तहसीलदार पवार यांनी पंचनामा करीत दोन्ही ट्रक ताब्यात घेत. देवरी तहसील कार्यलयात जमा केले. दुसरीकडे गावातून होणारी अवैध वाहतूक आणि अवैध उत्खनन पाहता ए. जी. पी. एल. कंपनी कडून दंड आकारून पुराडा ते शिरपूर रस्ता दुरुस्त करून द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी माजी आमदार संजय पुराम यांनी तहसीदरांच्या संगणमताने ही अवैध वाहतूक होत असल्याचा आरोप केला आहे.
पुराडा येथील सरपंच लक्ष्मीशंकर मरकाम यांनी सांगितले की गावात वाहनांमुळे धूळ उडते आणि लोकांच्या घरात जाते. ही धूळ उडू नये याकरिता त्यावर उपाय योजना म्हणून रस्त्यावर कंपनीने पाणी मारायला पाहिजे मात्र रस्त्यावर पाणी मारताना मी कधी पाहिले नाही. दगड खानी मध्ये ब्लास्टिंग करते वेळी भोंगा वाजवला पाहिजे मात्र तसे देखील करीत नाही. त्या मुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे. शेतात काम करीत असताना एखादा दगड अंगावर आल्यास जिवीत हानी होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पुराडा गावा नजीक होणारा अवैध उत्खनन मुळे गावातील दोन लोक जख्मी झाले असल्याचे काही गावकरी सांगतात. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी गावाकऱ्यांनी केली आहे. देवरीचे प्रभारी तहसीलदार पवार यांना विचारणा केली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन ट्रकवर दंडात्मक कार्यवाही करू असे माध्यमाना सांगितले आहे. झालेल्या कार्यवाई नंतर आता तरी कंपनी नियमाने काम करणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.