सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दी. 01 नोहेंबर : तालुक्यातील ग्राम सौंदड येतून लोकमत वृत्त पत्रासाठी लिहिणारे दैनिक लोकमतचे प्रतिनिधी अरविंद बीसेन (45 वय ) अंदाजे यांचे दि. 31 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 : 00 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कमी वयात झालेल्या दुःखद घटने मुळे गावात हळ हळ वेक्त होत आहे.
पश्चात एक मुलगी, पत्नी आणि त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार बुधवार दि. 01 नोहेंबर रोजी त्यांच्या स्वगावी खांबी /पिंपळगाव तालुका अर्जुनी मोरगाव येथे 11 वाजता होणार आहे. रात्री 7 वाजता त्यांचे पार्थिव गावाकडे रवाना करण्यात आले. दरम्यान गावातील नातेवाईक उपस्थित होते. सौंदड च्या लोहिया नगर येथे ते राहत होते.
पत्रकार बबलु मारवाडे यांनी 2019 मध्ये लोकमत वृत्तपत्राला लिहिणे बंद केल्या नंतर बीसेन यांनी लोकमत वृत्त पत्राला लिहिणे सुरू केले होते. तर कृषी साहित्य विक्रीचे दुकान सौंदड येथे चालवत होते. मन मिळाऊ स्वभावाचे असल्याने गावात त्यांची दाट मित्रता होती. महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे ते तालुका सदस्य होते. तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व कृषी दुकाने आज बंद राहतील अशी माहिती मिळत आहे.