वीरांगना राणी दुर्गावती त्याग, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक आहे : आमदार मनोहर चंद्रिकापुरे



अर्जुनी मोर., दि. 30 ऑक्टोंबर : जिल्हा परिषद हायस्कूल नवेगावबांध येथे एकात्मिक आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने वीरांगना राणी दुर्गावती यांचा जीवनावर आधारित महानाट्यकाचे आयोजन 29 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. या महानाट्यकाचे उद्घाटन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभहस्ते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी राणी दुर्गावती त्यांच्या शौर्य आणि त्यागावर प्रकाश टाकला. शौर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राणी दुर्गावतीचे लढाऊ कौशल्य वाखाण्याजोगे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या राजवटीत मठ, मंदिरे, विहिरी, बाबरी, धर्मशाळा यासह अनेक धार्मिक व सामाजिक सांस्कृतिक कामे झाली जी आजही प्रेरणादायी आहेत.

पुढे म्हणाले की, राणी दुर्गावतीसारख्या धाडसी महिला आजच्या महिलांचा आदर्श ठरावा. त्यांनी सांगितले की 5 ऑक्टोबर 1524 रोजी महोबाचे राजा कीर्ती सिंह यांना जन्मलेली ती एकुलती एक मुलगी होत्या. लग्नाच्या चार वर्षांनंतर पतीच्या अकाली निधनानंतर, तिने आपला तीन वर्षांचा मुलगा वीर नारायण याला गादीवर बसवले आणि स्वतःचे पालक म्हणून राज्य करू लागली. त्याने अनेक वेळा दुष्ट मुघल शासकांशी लढून संपूर्ण प्रदेशाचे रक्षण केले. त्याने अकबर, आसिफखान राजबहादूर इत्यादींनाही मात दिला. ते म्हणाले की, एकीकडे भारतीय स्त्री ही नम्रता, सौंदर्य आणि भक्तीचे मूर्ति आहे. तर दुसरीकडे ती त्याग, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक आहे. असे गुण प्रत्येक स्त्रीमध्ये असतात. आपल्याला फक्त त्यांना शोधण्याची आवश्यकता आहे.

आजच्या युवा पिढीला भारत वीर भूमीत जन्मलेल्या देशभक्त आणि महापुरुषांच्या जीवनाची ओळख करून घ्यावी तसेच महापुरुषांच्या जीवन चरित्र वाचण्याचे आव्हान केले. या कार्यक्रमाप्रसंगी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष तथा लेखक दशरथ मडावी, जि.प. सदस्या रचनाताई गहाणे, पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, उपसरपंच रमन डोंगरवार, दिग्दर्शक राजु बोरसे व हजारो नाट्यरसिक उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें