खा. प्रफुल पटेलांचे प्रयत्न सफल; गोंदिया (बिरसी) विमानतळावरून नियमित प्रवासी विमान सेवा सुरु होणार!



गोंदिया, दि. 30 ऑक्टोंबर : तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. या विमान स्थळावरून फ्लॉय बिग कंपनीने गोंदिया, इंदोर, हैद्राबाद अशी सुरु झालेली विमान सेवा फक्त काही महिन्याच्या औटघटकेची ठरली. विमानतळाची अत्याधुनिकता व विमान सेवा सुरु करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याने या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यास इंडिगो एअरलाइन्स या कंपनीने अनुकूलता दर्शविल्याची आहे.

या विमानतळावरील खंडित झालेली प्रवासी विमान वाहतूक सेवा पुन्हा सुरू होणार आहे. बिरसी विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्स नियमित उड्डाण भरण्यास सज्ज झाल्याने यामुळे क्षेत्रातील नागरिक, शेतमाल, व्यापाराला चालना मिळणार आहे. बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून, मागील वर्षी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, ही सेवा प्रवाशांसाठी केवळ औटघटकेचीच ठरली. मात्र काही महिन्यांतच ही सेवा बंद झाली.

त्यानंतर आता विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेच्या उड्डाण भरण्यास कामठा-परसवाडा मार्गाचा खोडा निर्माण झाला होता. हि अडचण खा. प्रफुल पटेल यांनी दूर करून बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यात यावी, यासाठी खा. प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा केला. तसेच काही विमान कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर इंडिगो कंपनीने बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यास अनुकुलता दर्शविली आहे.

बिरसी विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरूनच कामठा – परसवाडा हा मार्ग गेला आहे. या मार्गामुळे रन वेच्या रूटमध्ये अडचण निर्माण होत आहे. हि बाब माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यात कुठल्याही मार्गाची अथवा गावाची अडचण येऊ नये; तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाची काही नियमावली आहे; मात्र त्यामुळेसुद्धा प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यास अडचण निर्माण होत होती. आता ही अडचणसुद्धा खा.प्रफुल यांच्या प्रयत्नाने दूर केली जाणार आहे.

या मार्गावर सुरू होणार सेवा
फ्लॉय बिग कंपनीने इंदूर-गोंदिया-हैदराबाद अशी विमानसेवा सुरू केली होती. याला प्रवाशांचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर आता इंडिगो कंपनी बिरसी विमानतळावरून मुंबई, पुणे, हैदराबाद आणि इंदूर अशी सेवा सुरू करण्याची शक्यता असल्याचे माजी आ. राजेंद्र जैन यांनी सांगितले


 

Leave a Comment

और पढ़ें