- बाणटोला येथे चिखली जि.प. क्षेत्र कांग्रेस पक्षाची बुथ अध्यक्षांची सभा संपन्न.
सड़क अर्जुनी, दि. 30 ऑक्टोंबर : तालुका काँग्रेस कमेटी अंतर्गत चिखली जि. प. क्षेत्र काँग्रेस पक्षाची बुथ अध्यक्षांची सभा दि. 29 ऑक्टोंबर रोजी बानटोला येथिल सुधाकर कुर्वे यांच्या निवासस्थानी गोंदिया जिल्हा कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेत बुथ अध्यक्षांचा आढावा घेण्यात आला तर बुथ निहाय कमेटी तयार करणे, ग्राम कांग्रेस कमेटी तयार करणे व पक्ष संगठन वाढविणे इत्यादि बाबद चर्चा करण्यात आली. यावेळी सभेत जिल्हा अध्यक्ष दिलीप बन्सोड यांच्या हस्ते गोंदिया जिल्हा कांग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून युवा कांग्रेस कार्यकर्ते रोशन खुशाल बडोले यांना नियुक्ति पत्र देण्यात आले. तर छन्नीलाल साखरे यांनी कांग्रेस पक्षाचा दुपट्टा घालुन पक्षात प्रवेश केला.
यावेळी सडक अर्जुनी तालुका कांग्रेस कमेटी चे तालुका अध्यक्ष मधुसुदन दोनोडे, प्रदेश प्रतिनिधि दामोदर नेवारे, तालुका अनुसूचित जाति सेल चे अध्यक्ष हरीश बन्सोड, माजी प. स. सदस्य अर्जुन घरोटे, माजी सरपंच सुधाकर कुर्वे, शंकर मेंढे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर यावेळी कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक शंकर मेंढे यांनी केले. आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्ष अर्जुन घरोटे यांनी केले.
