खा. प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांना यश; जिल्ह्यातील ६ माजी मालगुजारी तलावांचा होणार कायापालट



  • खोडशिवनी, मलिजुंगा, गिरोला, खाडीपार, कोसमतोंडी, मोरगाव या तलावांच्या दुरुस्थी, खोलीकरणाच्या कामाला ५ कोटी रुपये मंजुर. 

गोंदिया, दी. 30 ऑक्टोंबर : जिल्हातील सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यातील माजी मालगुजारी तलावांची दुरुस्थी व खोलीकरण व्हावे अशी मागणी दोन्ही तालुक्यातील नागरिकांची होती. त्या मागणीला अनुसरून पाटबंधारे विभागानी प्रस्ताव तयार केले या प्रस्तावांना मंजुरी मिळावी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी हा विषय खा. प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिला.

खा. प्रफुल पटेल यांनी सदर विषय राज्याचे वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे ठेवला. तात्काळ मा. वित्तमंत्र्यांनी नागपूर पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या कडे पाठवून मंजुरी प्रदान करावी असे निर्देश दिले आणि शेवटी सुमारे ५ कोटी रुपये खर्चाच्या खोडशिवानी, मलेजुगा, गिरोला, खाडीपार, कोसमतोंडी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोरगाव या तलावांचे दुरुस्थी व खोलीकरणाच्या कामाला विदर्भ पाटबंधारे विकास मंडळांनी मंजुरी प्रदान केली आहे.

सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी, कोसमतोंडी, गिरोला, मालेजुंगा, खाडीपार, अर्जुनी मोर तालुक्यातील मोरगाव या माजी मालगुजारी तलावांचे दुरुस्थी व्हावी अशी त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी होती. खोडशिवानी, तलावाची लागवडी योग्य क्षेत्र २४६ , मालीजुगा तलावाचे लागवटी क्षेत्र १६४ व सिंचन क्षेत्र १४६ , गिरोला तलावाचे लागवटी योग्य क्षेत्र १५७ व सिंचन क्षेत्र १३७ खाडीपार तलावाचे लागवटी योग्य क्षेत्र १२२ व सिंचन क्षेत्र ११०, कोसमतोंडी तलावाचे लागवटी योग्य क्षेत्र २६१ व सिंचन क्षेत्र २१० व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोरगाव तलावाचे लागवटी योग्य क्षेत्र २५९ व सिंचन क्षेत्र १७९ हे सर्व आकडे पाहता या माजी मालगुजारी तलावा पासून सिंचन क्षमता कमी झाल्याचे लक्षात येते.

त्यासाठी या तलावातील गाळ काढणे व दुरुस्थी करणे जरुरीचे होते. त्यामुळे या तलावांच्या दुरुस्थीचे प्रस्थाव शेतकऱ्यांच्या मागणी नुसार तयार करावे अस्या सूचना खा. प्रफुल पटेल यांनी केल्या होत्या. गोंदिया पाटबंदीजरे विभागाने प्रस्ताव तयार करून विदर्भ विकास महामंडळाला सादर केला. त्यानंतर माजी आमदार राजेंद्र जैन जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून राज्याचे वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सदर प्रकरण त्यांच्या लक्षात आणून दिले.

तेव्हा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याशी चर्चा करून सदर कामांना तातडीने मंजुरी प्रदान करावी असे निर्देश दिले. त्याला अनुसरून विदर्भ विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी सुमारे ५ कोटी खर्चाचे तलावांच्या दुरुस्तीला व खोलीकरणाच्या कामाला नुकतीच मंजुरी प्रदान केली.

यात मोरगाव ९५ लक्ष रुपये, खाडीपार ५९ लक्ष रुपये, खोडशिवानी १०१ लक्ष रुपये, मालिजंगा ७८ लक्ष रुपये, गिरोला ७२ लक्ष रुपये व कोसमतोंडी ११० लक्ष रुपये या प्रमाणे निधी मंजूर करून तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या माजी मालजुगारी तलावांच्या दुरुस्ती व खोलीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाल्याने या तलावांच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी खा. प्रफुल पटेल, ना. अजितदादा पवार, राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर यांचे आभार मानले आहेत.


 

Leave a Comment

और पढ़ें