गोंदिया, दी. 28 ऑक्टोबर : शाहरुख हमीद शेख राहणार कुऱ्हाडी तालुका गोरेगाव याचेविरुद्ध पोलीस ठाणे गोरेगाव येथे अवैध दारू विक्री, भांडण तंटा, विनयभंग संबंधाने अनेक गुन्हे दाखल आहेत. गोरेगाव पोलिसांनी त्याचे विरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्याचेत सुधारणा झालेली नाही. सदर गुन्हेगाराच्या कृतीमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्याचे विरूद्ध पोलीस निरीक्षक, श्री. भुसारी , पोलीस ठाणे गोरेगाव यांनी गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करणे करीता कलम 56 (1),(अ),(ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांचेकडे मंजुरी स्तव सादर केला होता.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांचे आदेशानुसार श्री. संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून सदर गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा श्रीमती- पुजा गायकवाड यांनी नमूद जाब देणार यास 3 महिन्याच्या कालावधी करीता गोंदिया जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश पारित केले आहे. गोंदिया जिल्हा पोलीस व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा श्रीमती- पुजा गायकवाड यांनी केलेल्या हद्दपार कारवाईमुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे.