आमगांव, दी. 28 ऑक्टोबर : आदिवासी बहुल अशी ओळख असेलेल्या गोंदिया जिल्यातील आदिवासी मुला मुलींना तालुका मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेता यावे या साठी देवरी प्रकल्प अधिकारी कार्यलयाच्या वतीने आमगाव तालुक्याच्या बिर्शी गावात 5 कोटी 37 लक्ष 88 हजार रुपये खर्चून मुलींचे वस्ती गृह बांधण्यात येत आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय गावित यांच्या हस्ते या वसतिगृहाचे भूमिपूजन 27 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. तर काही दिवसा पूर्वी देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदर सहसराम कोरोटे यांनी देखील याच वस्ती गृहाचे भूमिपूजन केले होते.
तर आज पुन्हा आदिवासी मंत्र्यनाच्या हस्ते मुलींच्या वस्ती गृहाचे भूमिपूजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार संजय पुराम आणि देवरी प्रकल्प अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. लवकरच हे वस्ती गृह तयार करून मुलींन करिता उपलब्ध करून देण्यात याव्या अस्या सूचना मंत्री मोहद्यानी प्रकल्प अधिकारी आणि कंत्राट दाराला दिल्या आहेत.