कचारगड येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय गावित यांच्या हस्ते भक्त निवसचे भूमिपूजन


  • आदिवासी समाजाचा उगम स्थान समजल्या जाणाऱ्या कचारगड येथे भूमिपूजन.. 

आमगांव, दी. 28 ऑक्टोबर : आदिवासी समाजाचा उगम स्थान समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्याच्या सालेकसा तालुक्यातील कचारगड या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असून याचं गुफेत आदिवासी समाजाचे कुल दैवत पारी कोपार लिंगो माँ काली कंकाली देवस्थान असून दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या कोया पूनम यात्रेला या ठिकाणी पाच दिवशीय यात्रा भरते.

येथे तब्ब्ल 16 राज्यातील 10 लाखाच्या वर भाविक या ठिकाणी आपल्या कुल देवाच्या दर्शना करिता येत असून या ठिकाणी आदिवासी समाजाचा दोन दिवशीय गोंडवाना संमेलन होते. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांनसाठी राहण्याची सोय नसल्याने भक्त निवासाची मागणी अनेक दिवसा पासून होत आहे.  माजी आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी येणाऱ्या आदिवासी बांधवान साठी भक्त निवासाची व्यवस्था करण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजय गावित यांच्या कडे मागणी करण्यात आली असता डॉ. गावित यांनी या ठिकाणी मागच्या वर्षी संमेलनात भक्त निवासाची सोय करून देणार असल्याचे शब्द दिले होते.

आज 27 ऑक्टोबर रोजी आदिवासी मंत्री डॉ. विजय गावित यांच्या हस्ते या ठिकाणी 3 कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या भक्ती निवसाचे भूमिपूजन करण्यात आले. असून एका वर्षाच्या कालावधीत भक्त निवास तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात याव्या अस्या सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय गावित यांनी कंत्राटदाराला दिल्या आहेत.


 

Leave a Comment

और पढ़ें