- उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांची कारवाई
अर्जुनी मोर., दी. 28 ऑक्टोबर : अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी अतिशय संवेदनशील असलेल्या धाबेपवनी, जांभळी मार्गावर पकडला ही धडक कारवाई ( ता. २२ ) ऑक्टोबर रोजी रात्रीचे ९.५२ वाजता करण्यात आली. सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध उत्तखणण होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्याना मिळाली. सरकारी गट आणि जंगल परिसरात जेसीबीसह सचिन चैतराम कापगते यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ३५ ए. जी. ५३४८ व दूसरा विना क्रमांक असलेला मुरूम भरून बाहेर निघणारा ट्रॅक्टर रस्त्यावर येताच पकडला.
तर दूसरा ट्रॅक्टर मात्र पळून गेला. रात्रीची वेळ आणि परिसर घनदाट जंगल, वन्य प्राण्यांच्या वहिवाटिचा होता. सोबत केवळ वाहन चालक असल्यामुळे जेसीबीने मुरमाचे अवैध उत्खनन करीत असल्याचा आवाज ऐकू आला मात्र जेसीबीला जंगलाच्या आतमध्ये टाकल्याने दिसून आली नाही. अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त परिसर असलेल्या या भागाला अचानक व आकस्मिक भेट दिल्याने अवैध उत्खनन करणाऱ्या तस्कराला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज तस्करांवर आळा बसेल.
झालेल्या कारवाईमध्ये एका ट्रॅक्टर वर 1 लाख 6 हजार रुपयाचा दंड ट्रॅक्टर मालक यांनी भरून दिला आहे. तर दूसरा ट्रॅक्टर जमा करण्याच्या सूचना दिल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले आहे. सगळीकडे नवरात्र उत्सवाची धामधूम असल्यामुळे या अवैध मुरूम तस्कराने संधीचा फायदा घेत अगदी सहा वाजल्यापासून सरकारी गटातून जेसीपी ने उत्खनन करून दोन ट्रॅक्टरने वाहतूक सुरू केली होती. ही बाब एका प्रामाणिक कर्मचाऱ्याने उपविभागीय अधिकाऱ्यांना लक्ष्यात आणून दिली. त्याची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळ गाठून अवैध तस्करांच्या मुसक्या आवळल्या. ”मात्र दुसरीकडे एक नायब तहसीलदार आणि काही महसूल विभागाचे कर्मचारी ( अवैध गौण खनिज ) मुरूम तस्करांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेत होते. अशी चर्चा परिसरात होती.