- सहा गावातील 74 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण/भूमिपूजन थाटात संपन्न.
गोंदिया, दि. 25 ऑक्टोंबर : जनतेने 2019 मध्ये मला अपार प्रेम आणि विश्वासाने निवडून दिले, जेणेकरून मी त्यांना प्रत्येक संकटात आणि प्रत्येक कामात साथ देऊ शकेन. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो पूर्ण करणे ही माझी जबाबदारी आहे. या संकल्पनेतून मी लोकसेवक म्हणून काम करत आहे.
वरील प्रतिपादन जनता की पार्टीचे संस्थापक व क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी 74 कोटी रुपये निधितुन करण्यात आलेल्या कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात व्यक्त केले.
गोंदिया विधानसभेच्या इर्री, नवरगाव कला (खुर्द), लहिटोला, लोहारा, गिरोला (पा.), घिवारी या गावांमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, आमचा भूमिपूजन कार्यक्रम म्हणजे कामाची सुरुवात.
ते म्हणाले, पूर्वीच्या विकासपुरुषाला परिसरातील जनतेने 27 वर्षे दिली, मात्र त्यांचे कार्य प्रासंगिक राहिले आहे. प्रासंगिक म्हणजे, अनेक ठिकाणी भूमिपूजन च्या फलक लावण्यात आले, परंतु ते कार्य झालेले नाही. आजही ती माणसे खेड्यापाड्यात कुदळ मारताना दिसतात. आमच्या प्रयत्नातून मंजूर झालेली कामे स्वतःची असल्याचा दावा ते करत आहेत.
27 वर्षे लोकप्रतिनिधी राहिलेली व्यक्ती आजही ग्रामपंचायतींची कामे स्वत:ची असल्याचे सांगून भूमिपूजन करीत आहे, हे अत्यंत हास्यास्पद आहे. खोटे श्रेय घेऊन तो व्हॉट्सअप यूनिवर्सिटी मध्ये सक्रिय आहे.
ते पुढे म्हणाले की, विकासकामे जनतेपर्यंत नेण्यासाठी गेल्या दोन वर्षांत जे काम केले, ते काम गेल्या 27 वर्षांत झाले नाही, असा माझा दावा आहे. लोक म्हणतात, आमच्या गावात एकाच वेळी इतके करोडोंची कामे पहल्यांदाज पाहिलेली आहे. प्रत्येक गावात कृषी गोदाम, महिलांसाठी आधुनिक महिला भवन हे राज्यातील पहिले मॉडेल असून ते केवळ गोंदिया परिसरात केले जात आहे.
कार्यक्रमादरम्यान पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, कृउबास सभापती भाऊराव उके, कृउबास संचालक छत्रपाल तुरकर, जि.प.सदस्य आनंदा वाढीवा, वैशाली पंधरे, कृउबास संचालक जितेश टेंभरे, मोहन गौतम, बारलिंगेताई, विक्की बघेले, व सरपंच, उपसरपंच चाबी संगटनाच्या प्रमुख पदाधिकारी, आणि सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.