वाळू चोरीवर लगाम! उपविभागीय अधिकारी यांची धडक कारवाई, 2 जेसीबी, 6 ट्रक जप्त. 


भंडारा, दी. 21 ऑक्टोबर : जिल्ह्यातील बावनथडी नदी पात्रातून सायंकाळच्या सुमारास अवैध वाळू उपसा करताना 2 जेसिबी मशीन, 6 ट्रक तुमसर उपविभागीय अधिकारी यांनी 20 ऑक्टोबर रोजी कारवाई करत जप्त केले आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा, बावनथडी नदीची वाळू दर्जेदार असल्याने या वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.



त्यासाठी स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेण्यासाठी वाळू माफिया काही अधिकाऱ्यान सोबत साठगाठ करुण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जेसीबी मशीन द्वारे नदिमधून वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करतात. तर काही दिवसापूर्वी तुमसर येथे रुजू झालेल्या दर्शन निकालजे उपविभागीय अधिकारी यांना माहिती मिळाली की बावनथडी नदी पात्रातील चांदमारा वाळू घाटावर जेसीबी मशीनच्या साहाय्याने उपसा सुरू आहे.

त्यामुळे अधिकाऱ्यांनी गोपनीय पद्धतीने वाळू घाटावर धाड टाकत 2 जेसीबी, 6 वाळूने भरलेले ट्रक जप्त करत कारवाही केली आहे. या कारवाई मुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें