- धानाला प्रती क्विंटल ४ हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी
- शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात प्रधानमंञ्यांना निवेदन
गोंदिया, दी. 21 ऑक्टोबर : गोंदिया जिल्हा प्रामुख्याने धान उत्पादक जिल्हा असुन येथील शेतकरी खरीप व रब्बी हंगामात धान पिकाची लागवड करीत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार सत्तेत असताना बारीक धानाला ३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला होता. सध्या सर्वत्र महागाई वाढली असून धानाला प्रतिक्विंटल केवळ २१०० रुपये हमीभाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप करीत धानाला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये हमीभाव द्या. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केली आहे.
यांसह विविध मागण्यांचे निवेदन देशाच्या प्रधानमंत्र्यांना व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सडक अर्जुनीच्या तहसीलदार मार्फत पाठविले आहे. प्राप्त निवेदन नुसार, गोंदिया जिल्हा प्रामुख्याने धान उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेतात धान पिकाची लागवड करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा माजी खासदार शरदचंद्र पवार सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या धानाला प्रतिक्विंटल ३ हजार रुपये हमीभाव दिला होता. सध्या सर्वत्र महागाई वाढली असून खतांसह कीटकनाशकांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने शेत मशागतीच्या खर्चात देखील वाढ झाली आहे.
शेतीच्या खर्चात सातत्याने वाढ होत असून धान पिकाच्या हमीभावात मात्र अत्यल्प प्रमाणात वाढ होत. असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असेल तर शेतकऱ्यांच्या धानाला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये हमीभाव द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना १६ तास विजापुरवठा करावा, पोलीस पाटील पद भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. असाच प्रकार कोतवाल पद भरती मध्ये झाला.
निवेदने व आंदोलनाचा इशारा देताच फेरपरीक्षा घेऊन त्यावर सारवा – सारव करण्यात आले परंतु दोषी असलेले उपविभागीय अधिकारी आणखी जोमाने हाच प्रकार करीत असल्याचा आरोप करीत पोलीस पाटील पदभरती रद्द करून उपविभागीय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, कंत्राटी पदभरतीचा शासन आदेश रद्द करण्यात यावा, शाळा खाजगीकरणाचा निर्णय रद्द करण्यात यावा, ७५ वर्षाची अट शिथिल करून शेतकऱ्यांना पट्टे देण्यात यावे यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी दिला आहे. शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात सडक अर्जुनीचे तहसीलदारांमार्फत देशाच्या प्रधानमंत्री यांना व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देतेवेळी दिनेश कोरे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सडक अर्जुनी, लता गहाणे सरपंच फुटाळा, राजेश कोरे, देवानंद तागडे, डायमंड डोंगरे, आशिष येरणे, प्रकाश रहांगडाले, राहुल भोयर, गिता मेश्राम, नितेश खोटेले, गोंविदा पुस्तोडे, गोपल जमदाड, रोशन खोटेले, राजेश हुकरे, राधे गौतम, धनीराम ब्राम्हणकर, भास्कर मोहुर्ले, दिनेश बागडे, संघर्ष बोलके, धम्मदिप बडोले, कांता गहाणे, जिजा गहाणे, सुनंदा गहाणे , कमला राऊत, धृपदा मेश्राम, आशुबाई पुस्तोडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यासह बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
