पोलिसांची दोन ठिकाणी छापेमारी 1 कोटी 34 लक्ष रोकड सह 3 किलो 200 ग्रॅम सोनं जप्त


गोंदिया, दी. 21 ऑक्टोबर : ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरणात पुन्हा गोंदियात नागपुर पोलिसांची दोन ठिकाणी छापेमारी 1 कोटी 34 लक्ष रोकड सह 3 किलो 200 ग्रॅम सोनं जप्त करण्यात पोलिसांना यस मिळाले आहे. ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली नागपूरच्या तरुणाची ५८ कोटीं रुपयांनी फसवणूक करणाऱ्या बुकी अनंत ऊर्फ सोंटू जैन तब्ब्ल 3 महिन्या नंतर नागपूर पोलिसांना शरण येताच नवीन खुलासे समोर आले आहेत.



यात सोंटू जैनला आर्थिक व्यवहारात गोंदियातून मदत करणाऱ्या डॉ. गौरव बग्गा आणि ऍक्सिस बँकेचे मॅनेजर अंकेश खंडेलवाल यांच्या घरावर नागपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने 20 ऑक्टोबर रोजी छापेमारी केली. यात बग्गा यांच्या घरून 1 कोटी 34 लक्ष रोकड सह 3 किलो 200 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले. तर ॲक्सिस बँकेचे मॅनेजर यांच्या घरी सुद्धा छापेमारी करण्यात आली मात्र त्या ठिकाणी कुठलीही रोकड मिळाली नाही.

तर या आधी देखील सोंटू जैन यांच्या घरावर २२ जुलै २०२३ ला नागपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली असता त्यावेळी १६ कोटी ८९ लक्ष रुपये रोख, १२ किलो ४०३ ग्रॅम सोने आणि २९४ किलो चांदी जप्त केली होती. तर सोंटू जैन याला ज्या लोकांनी मदत केली आहे. त्याचा शोध नागपूर आर्थिक गुन्हे शाखा घेत असून यात आणखी आरोपी अटक होणार असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना दिली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें