- छत्रपती प्रतापसिंह शाळेचे होणार जीर्णोद्धार, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांनी घेतले होते येथे शिक्षण.
गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दि. 19 ऑक्टोंबर 2023 :
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण कार्य पूर्ण करून उच्च शिक्षण प्राप्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण सातारा येथील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे घेतले. ही शाळा आजही हयात आहे.
त्या शाळेला राज्य सरकारने राष्ट्रीय स्मारक घोषित करून त्याचा विकास करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रोशन बडोले यांनी दि. 8 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना लेखी निवेदनातून केली होती. त्या मागणीला यश मिळाले आहे.
7 नोव्हेंबर 1900 मध्ये सातारा येथील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या शाळेत त्याचे वर्ग पहिल्या मध्ये नाव दाखल करण्यात आले होते. त्यामुळे 7 नोव्हेंबर हा दिवस शाळा प्रवेश दिन म्हणून आजही साजरा केला जातो. सातारा येथील छत्रपती प्रतापसिंह शाळेला खुद्द सामाजिक कार्यकर्ते रोशन बडोले यांनी भेट घेऊन. बाबा साहेब आंबेडकर यांच्या नाव नोंदणीचे रजिस्ट्रीची सत्यप्रत देखील मिळवून घेतली.
यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव शाळेत दाखल असल्याचे आजही पुरावे आहेत. प्राथमिक शिक्षण घेतलेली शाळा आजही हयात असली तरी त्या शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
त्यामुळे रोशन बडोले सामाजिक कार्यकर्ता यांनी वरील शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करून त्या शाळेचा विकास करावे अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्याची दखल घेऊन या शाळेच्या विकासासाठी शासनाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालया मार्फत 20 सप्टेंबर 2023 ला शासन निर्णय घेण्यात आला व वरील शाळेच्या विकासासाठी 1 कोटी 25 लक्ष 87 हजार 684 रुपयाच्या निधी मंजूर करून घेण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते रोशन बडोले यांनी केलेली मागणी पूर्ण करण्यात आली असून सदर शाळेचा जीर्णोद्धार करून ती वास्तू जिवंत राहावी आणि येणारी भावी पिढीने ते पहावे यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. असे बडोले यांनी सांगितले.
