गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दि. १८ ऑक्टोबर : शाळा दत्तक योजना अंतर्गत, देण्यात येणारी माझी प्राथमिक मराठी शाळा, मला माझी किडनी घेऊन दत्तक देण्यात यावी अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी गोंदिया यांना १८ ऑक्टोबर २०२३ रोजी लेकेश सोहनलाल कावळे रा. मोहाडी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया यांनी केली आहे. तर सदर पत्रात संदर्भ, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण २०२३/प्र.क्र.४४ एस डी-६ असे नमूद करण्यात आले आहे.
पत्रात दिलेली सविस्तर माहिती पाहू या – महाराष्ट्र शासन संदर्भीय विषयानुसार अनेक शासकीय शाळा दत्तक देणार आहे. त्यापैकी मी शिक्षण घेतलेली जिल्हा परिषदची वरिसठ प्राथमिक शाळा मोहाडी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया. हि शाळा दत्तक योजने अंतर्गत मला चालविण्यासाठी देण्यात यावी, त्या करिता लागणारी नगद रक्कम माझ्याकडे नसल्या कारणाने मी महाराष्ट्र शासनास ” माझी एक किडनी देण्यास तयार आहे. एक किडनी विकून भरणा न झाल्यास ” दुसरी किडनी ” देण्यास तयार आहे. मी माझ्या स्वच्छेने, अतिशय स्वच्छ विचाराने, कोणतेही नशा पानी न करता पूर्णपणे शुद्धीवर राहून संपूर्ण महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या मुलांच्या भविष्याचा शैक्षणिक विचार करून व महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठी प्राथमिक शाळांच्या प्रेमापोटी हा निर्णय घेतला आहे. तरी कृपया माझी शाळा मला देऊन उपकृत करावे अशी विनंती पत्रातून केली आहे.
राज्य सरकार राज्यात खाजगी करण करीत अशल्याने एका सामान्य माणसाने शासन कर्त्यांना न कळत या पत्रातून विनंती केली आहे. असे अशले तरी राज्य शासनाला देखील या माध्यमातून काही संदेश देण्याचा प्रयत्न या पत्रातून करण्यात आला आहे. लेकेश सोहनलाल कावळे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात, असे अशले तरी ते सध्या गावातील शाळेत शिक्षक उपलब्ध नशल्याने शाळेतील मुलांना ते स्वता शिकवत्तात.
