सौंदड – फुटाळा नदीपात्रातून रेतीचे अवैध रित्या उत्खनन जोमात सुरू


सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 15 ऑक्टोंबर : तालुक्यातील ग्राम सौंदड – फुटाळा परिसरातून रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैध रित्या उत्खनन सुरु आहे. त्या मुळे प्रशासनाला रोज लाखो रुपयाचा चुना लागत आहे. असे असले तरी स्थानिक प्रशासनाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. सौंदड फुटाळा परिसरातील नदी पात्रातून रेतीचे उत्खनन ट्रॅक्टरच्या माध्यमातून करून सदर रेती ट्रकमध्ये भरून बाहेर तालुक्यामध्ये विक्रीसाठी पाठवली जाते. या अवैध विक्रीतून प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा महसूल मिळत नाही.

हे देखील तितकेच खरे आहे. सध्या तालुक्यामध्ये कुठेही रेती घाट लिलाव नसले तरी नदीपत्रातून रेतीचे उत्खन मोठ्या प्रमाणात होत आहे. शासकिय यंत्रणेच्या सर्रास दुर्लक्षित पना मुळे प्रशासनाला लाखोंचा चुना लागत आहे. हे चित्र तालुक्यात दरवर्षी पाहण्यासाठी मिळते. वृत्त पत्रात बातम्या कितीही प्रकाशित झाल्या तरी कारवाई करणारी यंत्रणा अवैध कारभार करणाऱ्यांच्या खिश्यात असल्यामुळे  वाळू माफियांना तीळ मात्र फरक पडत नाही.

दरवर्षी होत असलेल्या अवैध वाळू उत्खनणातून गाव मार्गाची दयनीय व्यवस्था झाल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर शेती मार्गाचे देखील दनिय अवस्था झाल्याचे चित्र आहे. तालुक्यातून होत असलेल्या अवैध वाळू उत्खननावर प्रशासन कधी गंभीरपणे लक्ष देणार आणि कधी वाळू माफियांवर कारवाई करणार असा सवाल सामान्य जनतेच्या मनात प्रश्न करणारे आहेत.

सध्या तालुक्यातील वाळू आणि रॉयल्टी मध्य प्रदेश येथील दाखऊन काही लोक अधिकाऱ्यांना चमकावित असल्याचे लोक चर्चेतून बोलले जाते. याच वर्षी सौंदळ फुटाळा परिसरातून कोट्यावधी रुपयाची वाळू चोरी झाली होती. त्याची तक्रार वरिष्ठांना करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. यावरून असे लक्षात येते की कुंपणच शेत खात आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें