सडक अर्जुनी, दि. 15 ऑक्टोंबर : कोहमारा येथील वार्ड क्र. १ मधील शाक्यमुनी बुद्ध विहारात ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा अध्क्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अर्जुनी मोरगाव मतदार संघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व दिप प्रज्वलन करून गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्प अर्पण केले.
पंचशील व त्रिशरण घेऊन धम्मपुजा करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे सामुहिक वाचन करण्यात आले. आमदार मनोहर चंद्रिकापुरे, अजय लांजेवार, मिलन राऊत, यादोराव पंचमवार, वंदना थोटे इत्यादी मान्यवरांनी बौद्ध धम्माविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सरपंच प्रतिभा भेंडारकर, महेश डुंभरे, अस्मिता बडोले , योगेश्वरी लाडे, रुपाली टेभूर्णे, सुषमा डुंभरे, रजनी वरखडे, अनिता बडोले, दिनेश मसराम, संजय शहारे, अनिल दीक्षित उपस्थित होते तर रोहित जनबंधू, भावेश टेभूर्णे, कुपेश राऊत, रुपेश बडोले, मनीष जनबंधू, स्वस्तिक जनबंधू , भवसागर वालदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.