प्रभारी गटविकास अधिकारी खोटेले यांचा मनमर्जी कारभार, वरिष्ठांना निवेदन


  • खोटेले यांचा प्रभार तात्काळ काढण्याची निवेदनाद्वारे मागणी…

सडक अर्जुनी, दि. 15 ऑक्टोंबर : पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि. यशवंत गणविर, आमदार मनोहर चंद्रिकापुरे सह अनेकांना लेखी निवेदन देऊन प्रभारी गटविकास अधिकारी डी. एम. खोटेले यांचा प्रभार तात्काळ काढण्याची निवेदनाद्वारे दि. 13 ऑक्टोंबर रोजी मागणी केली आहे.

पंचायत समिती सडक अर्जुनी येथील गटविकास अधिकाऱ्यांचा कार्यभार सांभाळत असलेले प्रभारी गटविकास अधिकारी डी. एम. खोटेले हे मनमर्जी कारभार करत असल्याने पंचायत समितीचे पदाधिकारी त्रस्त आहेत. जर का पदाधिकारी गटविकास अधिकाऱ्यांमुळे त्रस्त असतील तर सामान्य जनतेला किती त्रास सहन करावा लागत असेल.

त्यामुळे जनतेला होणारा त्रास व सदर अधिकाऱ्याची हेंडसाळ वागणुक यामुळे त्यांचा तात्काळ पदभार काढण्याची मागणी या निवेदनातुन केली. जिल्हा स्तरावरून येणाऱ्या विविध योजनांची माहिती, पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, कोणत्याही कामाला मासिक सभेत न घेता ठराव पारित करणे, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांशी असभ्य वर्तन करणे, अश्या विविध तक्रारीसह प्रभार काढण्याची मागणी केली.

निवेदन देतेवेळी पंचायत समिती चे सभापती संगीता खोब्रागडे, उपसभापती शालिंधर कापगते, सदस्य चेतन वळगाये, शिवाजी गहाणे, डॉ. रुकिराम वाढई, अल्लाउद्दीन राजानी, निशा काशीवार, वर्षा शहारे, दिपाली मेश्राम, सपना नाईक उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें