सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) , दि. 09 ऑक्टोंबर : नुकतेच भाजप पक्षाला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या नंतर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशनुसार पक्षाने तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी हरीश बनसोड यांच्या खांद्यावर दिली आहे. 02 ऑक्टोंबर रोजी नव्याने सडक अर्जुनी तालुका काँग्रेस अनुसूचित जाती सेल ची कार्य कारणी गठित करण्यात आली आहे. यात तालुका अध्यक्ष पदी हरीश बनसोड याची नियुक्ती करण्यात आली. त्याच बरोबर सडक अर्जुनी तालुक्यातील अनुसूचित जाती काँग्रेस सेलची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात एकूण 31 सदस्यांचा समावेश आहे. तालुका अध्यक्ष म्हणुन हरीश बनसोड याची निवड करण्यात आली. तर एकूण 6 उपाध्यक्ष तर 4 सचिव, महा सचिव, कोषाध्यक्ष, सह कोषाध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख, सह प्रसिद्धी प्रमुख, यांची प्रतेकी 1 – 1 पद नियुक्त करण्यात आले आहे. त्याच बरोबर महिला सदस्य यांची 5 पद तर कार्य सदस्य यांची 10 पदे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यात हरीषकुमार बन्सोड अध्यक्ष, धनराज शेंडे उपाध्यक्ष, दिवाकर वासनिक उपाध्यक्ष, मोहपत राऊत उपाध्यक्ष, मनोज राऊत उपाध्यक्ष, रामलाल शहारे उपाध्यक्ष, धम्मदिप सुर्यवंशी उपाध्यक्ष, ब्रम्हानंद मेश्राम महासचिव, कैलास रामटेके सचिव, गणेश सोनवाने सचिव, प्रमोद फुल्लुके सचिव, मंगल वैद्य सचिव, धनपाल बडोले कोषाअध्यक्ष, रणदीश कांबळे सह कोषाअध्यक्ष, रत्नदीप रामटेके प्रसिद्धी प्रमुख, कृष्णा निखारे सह प्रसिद्धी, सुदेक्षणा राऊत महिला सदस्य, देवकन्या तागडे महिला सदस्य, आम्रपाली बन्सोड महिला सदस्य, लिनाताई उंदिरवाडे महिला सदस्य, सपना मेश्राम महिला सदस्य, कृपासागर जनबंधू कार्य सदस्य, रामलाल राऊत कार्य सदस्य, इंदल फुल्लुके कार्य सदस्य, रमेश मेश्राम कार्य सदस्य, राज्यपाल शेलारे कार्य सदस्य, नेकचंद बडोले कार्य सदस्य, कृष्णा बन्सोड कार्य सदस्य, अजय शहारे कार्य सदस्य, सुरेंद्र दहिवले कार्य सदस्य, धनराज वैद्य कार्य सदस्य अशी नव्या सदस्यांची नियुक्ती ची यादी जाहीर करण्यात आली आहे.
