गोंदिया, दी. ०९ ऑक्टोबर : जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोदा गावात अवघ्या ६० रुपयासाठी मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. आकाश दानवे (२१) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तर अल्पेश पटले असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अल्पेश याचे मृतक आकाशवर ६० रुपये उधारी होते. ते उधारीचे पैशे परतवण्यासाठी अल्पेश याने आकाश ला तगादा लावला.
यावर आकाश याने फोन पे ने परत करतो असे बोलला, त्यावर अल्पेश आणि आकाश या दोघांमध्ये वाद झाला. मारहाण करण्यासाठी अल्पेश पुढे आला असता मृतक आकाश याला धक्का लागल्याने तो रस्तावर पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली व तो बेशुद्ध पडला. ही घटना ०८ ऑक्टोबर रोजी ची आहे. त्यानंतर लगेच त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र दवनीवाडा येथे हलविण्यात आले व तेथून पुढे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आले परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती दवनीवाडा पोलिसांना देण्यात आली आहे. त्या आधारावर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.