- मंचावरून मार्गदर्शन करताना माजी मंत्री राजकुमार बडोले…
सडक अर्जुनी, दि. 07 ऑक्टोंबर : डोंगरगाव/खजरी येथे एक कोटी पंचवीस लक्ष रुपये निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन 05 ऑक्टोंबर रोजी संपन्न झाले. यात जलजीवन जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, २५/१४ अंतर्गत रस्ता बांधकाम, म. गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत रस्ता बांधकाम व घनकचरा व्यवस्थापन अश्या विविध विकास कामांचा समावेश आहे. यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनिल मेंढे व राजकुमार बडोले माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मंजूर बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, जिल्हा परिषद सदस्य भुमेश्र्वर पटले, पंचायत समिती उपसभापती शालिंदर कापगते, प. स. सदस्य चेतन वळगाये, शिशिर येळे तालुका महामंत्री, पौर्णिमाताई गणवीर सरपंच डोंगरगाव/खजरी, महेश गहाने सरपंच खजरी, देवराम डोये, ज्ञानेश्वर खोटेले उपसरपंच डोंगरगाव, तुकारामजी राणे ग्रा.प. सदस्य, टीकाराम शिवणकर, विनोद हुकरे, प्रभाताई रामटेके ग्रा. प. सदस्या, उषाताई डोये, अर्चनाताई ब्राह्मणकर, वनिताताई खोटेले, ताराबाई कठाने, रंजुताई चाचेरे, रवींद्र बोरकर, पुंडलिक लांजेवार, अक्षदेव गणवीर, मोहन खोटेले, जगन मानकर, वासुदेव मानकर, महादेव शेंडे, धनलाल डोये, यशवंत कठाने, विष्णू राणे, विनायक लांजेवार, खेमराज डोंगरवार, दिनेश कोरे व परिसरातील गणमान्य ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.