राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची कार्यकर्ता आढवा बैठक गोंदियात संपन्न.


  • शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवा : बजरंगसींह परीहार उपाध्यक्ष प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • आमदार अनिल देशमुख व आमदार रोहितदादा हे गोंदिया जिल्हात कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत : मिथुन मेश्राम 

गोंदिया, दि. 07 ऑक्टोंबर : जनसामान्यांपर्यंत शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार पोहचविण्याचा काम कार्यकर्त्यांनी करावे. आपला पक्षातुन काहि लोक बाहेर पडले त्यांचा विचार न करता पक्ष वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तन मन धनाने प्रयत्न करावे असे प्रतिपादन बजरंगसींह परीहार यांनी आयोजित आढावा कार्यकर्ता बैठक मध्ये केले.

व्दारका लान गोंदिया येथे 06 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानी बजरंगसींह परीहार निरीक्षक गोंदिया हे होते. प्रामुख्याने दिलीप पनकुले, दिनानाथ पडोळे, मिथुन मेश्राम, डायमंड डोंगरे, दिनेश कोरे, आशिष येरणे, राहुल भोयर, श्यामदेव रेहपाडे, सुरेश खोब्रागडे, तिरथ येटरे, सौरभ रोकडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मिथुन मेश्राम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, पक्ष हा नेता ने नाही तर कार्यकर्त्यांनी सुरू होतो. पक्ष जिल्हात आज शुन्यातून सुरू झाला आहे. जिल्ह्यातील युवक व सामान्य जनता हि शरदचंद्र पवार साहेब यांच्या सबोत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आता आपला पक्ष जिल्हात नंबर १ चा पक्ष बनविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावे.

८-१० दिवसात आमदार अनिल देशमुख साहेब व आमदार रोहितदादा हे गोंदिया जिल्हात कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सुप्रियाताई सुळे हे स्वता जिल्हाधीकारी यांच्या सी चर्चा करून सामान्य जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी तत्पर आहे. मनात कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार तळागळातील लोकांपर्यंत पोहचवा असे आवाहन मिथुन मेश्राम यांनी केले. यावेळी आमगाव तालुकाध्यक्ष भुमेश शेंडे, अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष सुरेश खोब्रागडे, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष दिनेश कोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ‌. यावेळी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें