हृदयविकाराच्या झटक्याने गोंदियातील सुपुत्राचा सीमेवर निधन


गोंदिया, दि. 03 ऑक्टोंबर : गोंदिया तालुक्याच्या ग्राम महालगाव येथील रहिवाशी आणि भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले लोधी देवीप्रसाद राधेलाल ( मुन्ना ) लिल्हारे ( 41 वय वर्षे ) यांचा आज 03 ऑक्टोबर रोजी सकाळी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. एक महिन्याच्या आत गोंदिया जिल्ह्यातील लोधी समाजाच्या दोन विरपुत्रांचे निधन झाले.

देवीप्रसाद यांच्या निधनाने गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. देवीप्रसाद हे हिमाचल प्रदेश येथील सिमला येथे सैन्य दलात हवालदार होते. आज सकाळी कवायती दरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शासकीय विधी पार पाडल्यानंतर बुधवार 04 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्या स्वगावी महालगाव येथे येईल. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी मीडिया प्रतीनिधींना दिली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें