गोंदिया, दि. 03 ऑक्टोंबर : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणारे ग्राम सौंदड येथे डेंग्यू मलेरिया सारख्या आजारावर नियंत्रण करण्यासाठी संपूर्ण गावात मशीन द्वारे फोगिंग करण्यात आली. सरपंच हर्ष मोदी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहिती नुसार त्यांनी सांगितले की सौंदड गावात 10 वर्षाच्या काळात फोगींग करण्यात आली नाही. मात्र आता तब्बल दहा वर्षा नंतर फॉगिंग करण्यात आली आहे. या मुळे डासांच्या प्रजणांवर नियंत्रण करण्यात मदत मिळेल.
तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की सौंदड गावात डेंग्यू चे रूग्ण वाढत आहेत, त्या मुळे गावात नियंत्रण करण्यासाठी उपाय यौजना करावे, सरपंच यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा हिवताप अधिकारी यांना लेखी निवेदन दिले, त्या वर तात्काळ कारवाई करीत जिल्हा विभागाने आवश्यक औषधी उपलब्ध करून दिली. तर ग्राम पंचायत इतर फंडातून निधी खर्च करून ग्राम पंचायत प्रशासनाने संपूर्ण गावात घरो घरी जाऊन मशीन द्वारे फोगिग केली. त्या मुळे गावात रोग राई वर नियंत्रण होणार असे सरपंच मोदी यांनी सांगितले.