गोंदिया शहरातील अंडरग्राउंड मार्गावरील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करा : सामाजिक कार्यकर्ते मनोज भांडारकर यांचे आमरण उपोषण


गांधी जयंतीच्या दिवशीच सुरू केले उपोषण… 


गोंदिया, दि. 03 ऑक्टोंबर : शहरातील अंडरग्राउंड परिसरातील रस्त्याची मागील अनेक वर्षापासून दुरुस्ती करण्यात आली नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी वांरवार नगर परिषदेचे लक्ष वेधण्यात आले, पण त्यांनी याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज भांडारकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.



अंडरग्राउंड मार्ग हा गोंदिया शहरातील दोन भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाच्या मार्ग असून दररोज हजारो नागरिक या रस्त्याने प्रवास करत असतात मात्र तरीही स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने व अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने सामाजिक कार्यकर्ते मनोज भांडारकर यांनी चक्क गांधी जयंतीच्या दिवशी शांतीच्या मार्ग पत्करून आमरण उपोषण सुरू केले आहे, तर विशेष बाब म्हणजे गांधीजींनी तीन बंदर च्या माध्यमातून जे संदेश दिले होते तेच तीन बंदर दाखवत उपोषणकर्ते मनोज भंडारकर यांनी प्रशासन देखील या गांधीच्या तीन बंदरांसारखा या रोडाकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप केला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें