नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प; पर्यटकांसाठी जंगल सफारी सुरू


  • पिटेझरी आणि गोठणगाव पासून जंगल सफारी…

गोंदिया, दि. 03 ऑक्टोंबर : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या वार्षिक वेळापत्रकानुसार ३० जून रोजी जंगल सफारी बंद करण्यात आली. १ ऑक्टोबरपासून तीन महिन्यांनी पर्यटकांसाठी ही जंगल सफारी सुरू झाली आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पांतर्गत असलेले कोका अभयारण्य सततच्या पावसामुळे पर्यटकांसाठी खुले होऊ शकले नाही. ते उघडण्यासाठी आणखी काही दिवस लागतील.

कोका अभयारण्य जिल्हा मुख्यालयापासून २० किमी अंतरावर आहे. या अभयारण्यात वाघ, हरीण, बिबट्या, अस्वल यासह विविध वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. घनदाट जंगल आणि अनेक जलाशय आहेत. त्यामुळे पर्यटक कोका अभयारण्याकडे आकर्षित होत आहेत. पावसाळा सुरू होताच ३० जूनला जंगल सफारी बंद करण्यात आली होती.

त्यानंतर तीन महिन्यांनी जंगल पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, यावेळी सप्टेंबर महिन्यात गोंदिया, भंडारा दोन्ही जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. यापुढेही पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे अभयारण्याचे रस्ते पुरते खराब झाले आहेत. सर्वत्र पाणीच पाणी आणि चिखल आहे. त्यामुळे पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाऊस न आल्यास येत्या आठवडाभरात कोका अभयारण्यात जंगल सफारी सुरू होऊ शकते. अन्यथा १५ ऑक्टोबरपासून पर्यटकांना जंगलात नक्कीच जाता येणार आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें